आमचे दृष्टी

शिक्षण हे प्रगतीचा पहिला टप्पा मानल्या जाते देशाला विकसनशील अवस्थेतून विकासाकडे नेण्याचा वाटचालीत शिक्षणाचा मोलाचा सहभाग भाग आहे. ज्ञानरूपी अमृताने मनुष्याचे जग आणि जीवन बदलते. शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित, समृद्धी व सशक्त होतो. त्याचे जीवनमान उंचावते. त्याची जीवाकडे पाहणाची दृष्टी आणि दृष्टीकोण बदलतो. त्याला परिस्थीतीचा सामना कर्तव्यांचे करण्याचे बळ शिक्षणामुळेच मिळते. चांगले शिक्षण हे काळाची गरज झाली आहे. स्पर्धा परीक्षांचा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या देशाची एक समृद्ध व सशक्त पिढी समोर येत आहे. यातूनच नवभारत निर्माणाचा विचार बळकट होण्यास मदत होत आहे.

याच पार्शवभूमीवर “मिशन देशभक्त पैरामिलिट्री डिफेन्स अकादमी” या राष्ट्रीय उपक्रमशीलतेतूण आजववरच्या वाटतचयालीत. सामाजिक दायित्व जोपासत स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातील विकास महत्वाचा मानला आहे. सैनिकी प्रशिशणासह विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक व शैक्षणिक प्रगतीसाठी लाभदायक ठरतील असे उपक्रम सातत्याने राबविले आहेत.

समाजाच्या तळागाळातील गरजवंत, दुर्बल घटकातील गरजू ,निराधार, अनाथ, होतकरू व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शेताणिक सुविधा उपलब्धी व्हावी, याकरिता संस्थात्मक स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून नवनवीन संकल्पना समोर आणल्या जात आहे.

सैन्यभरती व स्पर्धात्मक परीक्षांसह रोजगाराभिमुख व्यावसायिक, तंत्रीक, उद्यमशील आणि संगणकीय शिक्षणाची मवनवी दालने खुले करण्याचा संस्थाचे अविरत प्रयत्न राहिला आहे, मुख्यत्वे राष्ट्रभक्तीच्या संस्कारातून युवक घडविणे हाच “मिशन देशभक्ती” या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक जडणघडणीसोबतच लोकांना भौतिक विकास ब आंतरिक विकासाची संधी उपलब्ध करून समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यात “मिशन देशभक्त” चे कार्य अविरत सुरू आहे। यातूनच सर्व क्षेत्रात अगदी तळापासून सुदृढ, सशक्त आणि शाश्वत कार्य करणार नेतृत्व “मिशन देशभक्त” या उपक्रमाने निर्माण केेले आहेत.

सुस्पष्ट ज्ञान, अनुभव कौशल्य, क्षमता अणि प्रदीर्घ विचार मंथनातून तयार झालेले, गणिती पद्धतीने अत्यंत संक्षिप्त स्वरुपात विशिष्ट नमुन्यात मांडलेले, परिशितीच्या आधारावर समस्यांचा, प्रश्नांचा आढावा घेणारे, वास्तवाशी तारतम्य व सुसंगत असलेले, समाजापुढे असणाऱ्या प्रश्नांना समर्थ व निर्णयक उत्तर देणारे “मिशन देशभक्त पैरामिलिट्री डिफेन्स अकदमी” या संस्थेचे उपक्रम शिक्षणासाह, देशसेवा व सर्वोच्च क्षेत्रात मुलभूत परिवर्तन घडवून आणाऱ्या आकंस्थेने प्रेरित आहे.