अध्यक्षीय भूमिका

काळ कोणताही असो…. स्पर्धेला पर्याय नाही.” शिकत असताना आणि जीवन जगत असताना प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा ही अपरिहार्य आहे . स्पर्धा परिक्षा हा तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवासातील अविभाज्य आग होत आहे. देश व राज्य पातळीवर विविध पदावर स्पर्धा परीक्षेतून उमेदवार निवडले जातात. मॅनेजमेन्ट, इंजीनिअरिंग, मेडीकल याबरोबर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेशसुद्धा स्पर्धात्मक प्रवेश परीक्षाद्वारे दिले जातात जातात. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असणार सैनिक, सेनादलातील उच्जजप्रदस्थ अधिकारी नियुक्ती सुध्दा स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाते.

हे वास्तव स्विकारात “वंदे मातरम् एज्युकेशनल ॲन्ड सोशल वेलफेअर फाऊंडेशन अमरावती” या आम्च्या संस्थेने सर्वप्रथम भारतीय सेनेतील सैन्यभरतीच्या प्रशिक्षणार्थ तयारीला शास्त्रशुद्ध पद्धतीने सुरुवात करण्याची भूमिका घेतली. याच उद्देशाने संस्थेने “मिशन देशभक्त” या संकल्पनेतून सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षणाचा चा अभिनव व तेवढाच महत्वाकांक्षी उपक्रम सुरु केला आहे. भारतीय सेनेतील सैन्यभरती परीक्षेला समोर ठेऊन प्रशिक्षणाची व अभ्यासक्रमाची रचना केली. असे असले तरी सर्व स्तरावरील, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी व उत्तम व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची हमी आम्ही संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देतो. याकरीता “मिशन देशभक्त पॅरामिलिट्री डिफेन्स अकादमी” अंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्याकरीता मार्गदर्शनपर जनजागृतीचे आयोजन केला जाते.

कोणत्याही शाखेची पदवी ही यु. पी. एस. सी. सेवेसह एम. पी. एस यी. आदी स्पर्धा परीक्षांसाठी अनिवार्य आहे. इंजिनिअर, डाँक्टर हे पदवीधारकसुद्धा अगदी आवडीने या सेवा स्वीकारीत आहेत. महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगत राज्य असूनही केंद्रीय नागरी सेवेत राज्याचा सहभाग म्हणावा तेव्हा पुढारलेला नादीय माहितीचा अभाव अल्पसंतूष्टता, गैरसमज, योग्य नियोजनाचा अभाव यमुळे क्षमता असूनही “करिअर” म्हणून या सेवेच्या निवडीबाबत उदासीनता आढळते परिणामी वेळ, श्रम व पैसा यातील अपव्यय होतो. अपुऱ्या तयारीत झालेल्या अपयशामुळे तयारी करणारी विद्यार्थी, त्यांचे कुटुंबिय, हितचिंतक व समायावरही त्याचा नकारात्मक परिणाम होताना दिसतो परिणामी स्पर्धात्मक मानसिकतेची जडणघडण योग्य पद्धतीने होत नाही. यासाठी महाराष्ट्रात अभावानेच आढाळणारी “स्पर्धात्मक संस्कृती” व्यापक स्वरूपात आणि सर्वच स्तरात सुयोग्य पद्धतीने रुजविण्याचे ध्येय सामूहिक प्रयत्नातून साध्य करण्याची नितांत गरज आहे. महाराष्ट्राची मानसिकता मुलभूत स्वरूपात बदलण्यासाठीच्या दीर्घकालीन प्रयानांचा भाग म्हणून “मिशन देशभक्त” च्या प्रयत्नची दाखल महाराष्ट्राच्या विविध जिल्यातील विशर्थी आवर्जून घेत आहेत.

कोणत्याही क्षेत्रात आणि पर्यायाने जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वाधिक आवश्यकता असते, ती स्पर्धात्मक मानसिकतेची हुशारी, कष्ट करण्याची तयारी, सातत्य, इच्छाशक्ती याबरोबरच सतत स्पर्धेला सामोरे जाण्यासाठीच्या आत्मविश्वासशिवाय कोणतेही यश मिळत नाही “ज्याची स्पर्धा स्वतःशी त्याला जिंकणार कोण?” या उक्तीप्रमाणे स्वतःशीच स्पर्धा करीत. सवेत्तिम होण्यासाठीचा ध्यासच स्पर्धत्मक मानसिकता घडवित असतो. ही मानसिकता घडविण्याचे काम “वंदे मातरम् एज्युकेशनल ॲन्ड सोशल वेलफेअर फाऊंडेशन अमरावती” ही संस्था करीत आहे अशी मानसिकता असणारे विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेत आत्मविश्वासाने व आनंदाने सामील तर होतीलच . . . . पण यशस्वीसुद्धा होतील!