संस्थेविषयी

संपूर्ण जीवसृष्टीचे कल्याण हे जगातील मूलभूत सत्य आहे. जे देश प्रगत, विकसित आहेत त्यांनी या शाश्वत सत्याचा शोध घेतला, म्हणूनच ते स्वतःची तसेच इतरांची पर्यायाने देशा्ची प्रगती करतात. सर्वानाच वाटते सरकारने, प्रशासनने व इतर संस्थ्यानी किंवा दुसऱ्यांनी काही तरी करावे पण आपण काय, कधी आणि केव्हा करणार? परिस्थितीचे रडगाणे गात बसण्यापेक्षा मी काय करू शकतो, याचा शोध घेणे, जे करायचे आहे त्याचा ध्यास घेणे आणि तात्काळ कार्य सुरु करणे, अशा विचारांची चेतना म्हणजे “वंदे मातरम् एज्युकेशनल ॲन्ड सोशल वेलफेअर फाऊंडेशन अमरावती” ही समाजाभिमुख संस्था होय. त्याच संस्थेचा “मिशन देशभक्त” हा उपक्रम म्हणजे राष्ट्राला समर्पित अशी अनन्यत्वाची अद्भुत भावना होय.

मिशन देशभक्त पॅरामिलिट्री डिफेन्स अकादमी” च्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा समृद्ध विचार सुदृढ केल्या जात आहे. येथे राष्ट्रीय एकात्मता म्हणजे अपण सर्वप्रथम भारतीय आहो ही धरणा. सगळे भारतीय मग त्यांच्यात जातीभेद, धर्मभेद, प्रांतभेद, भाषाभेद नको. सर्वांबद्दल बंधुत्वाची भावना, आपल्या जीवननिष्ठांमध्ये राषट्रमिषेला अग्रक्रम व सर्वोच्च स्थान देण्याची वृत्ती. व्यापक देशहितासाठी संकुचित, वैयक्तिक, जातीय, भाषिक, धार्मिक व प्रान्तीय स्वार्थ आणि हितसंबंध यांचा त्याग करण्याची तयारी. देशातील सर्व भाषांबद्दल, जातीबद्दल, धर्मियांबद्दल, पक्षियांबद्दल जिव्हाळा व आत्मीयतेची भावना. व्यक्तित्व, जातीयत्व, भाषिकत्व, धार्मिकत्व, पक्षित्व यांचे राष्ट्रीयत्वात विसर्जन !

मिशन देशभक्त” म्हणजे हजारो बेरोजगार तरुणांना “प्रशिक्षणातून नोकरी”, मोफत प्रशिक्षण, महिला व बालकल्याण, कौशल्य विकास प्रशिक्षण, शारीरिक क्षमता चाचणी, पोलीस/सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण, त्यांचे मार्गदर्शन समुपदेशन, आरोग्य शिबिर, पर्यावरण जनजागृती, शेतकऱ्यांना मनोबल, व्यसनमुक्ती, साक्षरता, बेटी बचाओ अभियान, विविध विषयांवरील निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञानमंजुषा, इत्यादी क्षेत्रात काम करुन आदर्श समाजनिर्मितीचा उद्देशाने महाराष्ट्र राज्यातुन जास्तीत जास्त घडविण्यासाठी हायस्कूल स्तरावरच स्पर्धा परीक्षाच्या तयारीला सुरुवात करणारा अग्रगण्य उपक्रम होय. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनेक हायस्कूलमधील विद्यार्थी / विद्यार्थीनी “मिशन देशभक्त” उपक्रमात सहभागी आहेत आणि जीवनातील कोणत्याही स्पर्धेला समर्थपणे सामोरे जाण्याची ते ग्वाही देतात. देशसेवेसाठी उच्च प्रतीचे पुरेसे मनुष्यबळ करावे, याकरीता संस्था कटीबध्द आहे. संस्थेची ध्येय धोरणे अंमबलबजावणी ही एक प्रक्रिया असून प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे सर्व प्रकारच्या लोकांच्या प्रगतीस ती उपयुक्त आहेत.

प्रत्येकाच्या सर्वांगिण विकासाला संधी देणारी पोषक परस्थिती संस्थेचा माध्यमातून जाणीवपूर्वक जोपासली जाते. म्हणूनच अनेकांना या संस्थेच्या “मिशन देशभक्त” या उपक्रमामध्ये प्रशिक्षणाची संधी मिळावी, असे मनोमन वाटते.

आज “मिशन देशभक्त” हा विचार प्रत्येकाच्या घराघरात, घरातील प्रत्येकाच्या मनामनात नवनिर्मितीचे अधिष्ठान रूजवत आहे. कारण इथे ज्ञानाला आदर आहे, हुशारीला महत्व आहे, स्वाभिमानाला सन्मान आहे , आत्मविश्वासाला श्वास आहे, कष्टाला बळ आहे आणि या बळाला यशाची झेप आहे!