मिशन देशभक्त

Mr. Sudhir Chakre

 

 • आकाशाला गवसणी घालण्याची झेप असलेल्या आणि समृद्ध भारत निर्माणाकरीता अवकाशाची उंची व व्यापकता असलेल्या विद्यार्थ्यांचा समूह म्हणजे मिशन देशभक्त‘.
 • प्रत्येकाच्या अभंग आणि अत्युच कर्तुत्वास मायेचा व प्रतिसादाचा हात देणारं नायकत्व म्हणजे मिशन देशभक्त
 • माणसाचे मोठेपण हे त्याच्या पदावर आणि पैशावर नसून त्याच्यातील माणूसकीमध्ये आहे, याचे मूतीमंत उदाहरण म्हणजे मिशन देशभक्त
 • जुलुमाच्या हुकुमाला अंकुश लावणारे नितीयुद्ध म्हणजे मिशन देशभक्त‘.
 • समाजातील विधायक विचासरणीला कार्यप्रवण करणाऱ्या अन् राष्ट्र खंबीरपणे उभ करणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीच्या पाठीशी एक हिमत बनून उभ राहणारी वृत्ती म्हणजे मिशन देशभक्त
 • भारतीय लोकशाही बलवान करण्यासाठी सर्व जातीधर्मपंथ व संप्रदायाच्या लोकांना एकत्र घेवून परिवर्तनाच्या दिशेनं टाकलेलं लक्षणीय पाऊल म्हणजे मिशन देशभक्त
 • अफाट कर्तुत्व आणि अमर्याद करूणेचा झरा यांसह अत्युत्कट भावना व दयाळू मन यांचा हृदयस्पर्शी संगम म्हणजे मिशन देशभक्त
 • आपल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनात असलेले मुलभूत वैगुण्य नष्ट करण्याचे ध्येय असणारी उज्वल भावना म्हणजे मिशन देशभक्त
 • सर्वाबद्दल बंधुत्वाची भावना, आपल्या जीवननिष्ठांमध्ये राष्ट्रनिष्ठेला अग्रक्रम व सर्वोच स्थान देण्याची वृत्ती म्हणजे मिशन देशभक्त
 • व्यापक लोकहितासाठी संकुचित, वैयक्तिक, जातीय, भाषिक, धार्मिक अन् प्रांतीय स्वार्थ व हितसंबंध यांचा त्याग करण्याची तयारी म्हणजे मिशन देशभक्त‘.
 • देशाच्या विकासाकरीता जागरूक विचारांच्या भारतीय नागरिकांचा प्रवळ विचार म्हणजे मिशन देशभक्त‘.
 • व्यक्तीचा सर्वागीण विकास करणारी महानगराच्या विकासाची बहुआयामी चळवळ म्हणजे मिशन देशभक्त
 • निर्भेळ लोकशाहीच्या संधीसाठी बलीदानाच्या वचनावर समर्थन करणे म्हणजे मिशन देशभक्त
 • प्रामाणिक लोकसेवेसाठी आपली प्रज्ञा, प्रतिभा अनु परिश्रम खर्ची घालण्याची उत्स्फूर्त वृत्ती म्हणजे मिशन देशभक्त
 • रूळलेल्या वाटेने न जाता नव्या मार्गाचा अवलंब करीत नाविण्यपूर्ण पद्धतीने लोककल्याणाचा किरण आणणारा सूर्योदय म्हणजे मिशन देशभक्त‘.